turbhe

नवी मुंबई तुर्भे स्थानकावर तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

मुंबई

turbhe

नवी मुंबईत तुर्भे रेल्वे स्थानकात ४३ वर्षांच्या विकृताने विशीतल्या तरुणीचा विनयभंग केला. विकृत आरोपीने तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिथून पळही काढला. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी त्याला अवघ्या काही मिनिटात पकडले आणि त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.
तुर्भेत राहणारी २० वर्षांची तरुणी गुरुवारी सकाळी घणसोलीत ऑफीसला जात होती. तुर्भे स्थानकात लोकल ट्रेन वाट बघत ती थांबली होती. याच दरम्यान एका विकृताने तिला गाठले आणि तिला मिठी मारली. त्याने तरुणीचे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न देखील केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने तरुणीला धक्काच बसला. मात्र, तिने लगेच स्वतःला सावरले आणि त्याला प्रतिकार केला. तरुणीच्या प्रतिकारानंतर तो विकृत तिथून निघून गेला.
नरेश जोशीने आपला गुन्हा कबुल केला असून त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *