image-5

धक्कादायक ! सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानी

देश

image-5

सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भात अमेरिकेतील अकमै टेक्नोलॉजी या कंपनीने नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातील अहवालानुसार सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत सातव्या स्थानी आहे.ज्याप्रमाणात अनेक गोष्टींची डिजीटलायझेशन होत आहे त्याप्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होताना दिसत आहे. महत्वाची माहिती चोरण्याच्या उद्देशाने अनेक हॅकर्स डेटा चोरी करतात.
मागील वर्षी भारतात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी ४० टक्के म्हणजेच ५३ हजारहून अधिक सायबर हल्ले हे आर्थिक क्षेत्रांशीसंबंधीत बेवसाईट्स आणि अॅप्लिकेशन्सवर झाले आहेत. फिशिंग, वेब हॅक्स आणि मालवेअर प्रकारातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात २०१७ सालात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे ही वाढ आर्थिक व्यवहारांसंदर्भातील सेवांशी संबंधित आहे. त्यामुळेच भारताने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट वापरासंदर्भातील कठोर नियम, त्यासंदर्भातील पायाभूत सुविधा आणि त्यासंदर्भातील अॅक्शन प्लॅनवर लवकरात लवकर काम करुन डिजीटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायला हवा असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *