marine-drive

मुंबईमध्ये २४० कोटी रुपये मोजून ४ सदनिका खरेदी

मुंबई

marine-drive

वाढत्या महागाईमुळे घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. पण मायानगरी मुंबईमध्ये सगळ्यात महागड्या घरांची विक्री झाली आहे. एका व्यापारी कुटुंबानं मुंबईमध्ये ४ फ्लॅट २४० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्यामुळे एका घराची किंमत ६० कोटी रुपये एवढी आहे. सध्या हे फ्लॅट सगळ्यात महाग असल्याचं बोललं जातंय. पण दोन ते तीन वर्षांआधी याआधीही यापेक्षा महाग घरांची विक्री करण्यात आली होती. पण आत्ताच्या दोन ते तीन वर्षातली ही सगळ्यात महागडी घर विक्री आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार नेपिअन सी रोडवरच्या द रेसिडेंस टॉवरमध्ये २८वा ते ३१ व्या मजल्यावरचे ४ फ्लॅट रुनवाल ग्रुपच्या तपारिया कुटुंबानं विकत घेतले आहेत. तपारिया परिवाराकडे गर्भनिरोधक निर्माता फॅमी केअरची मालकी होती. याला त्यांनी तीन वर्षांपूर्वी जवळपास ४,६०० कोटी रुपयांना विकलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *