dbab4eeccca3b20f055afca89aa250c9

अभिनेता हृतिक रोशनचे ‘सुपर 30’ सिनेमासाठी कठोर परिश्रम

मनोरंजन

dbab4eeccca3b20f055afca89aa250c9

अभिनेता हृतिक रोशन हा बॉलिवूडचा सर्वात हॅण्डसम अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण सध्या तो आपल्या आगामी ‘सुपर 30’ सिनेमासाठी कठोर परिश्रम घेत आहे. या सिनेमात कॉमनमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटात ह्रतिक रोशन रस्त्यावर पापड विकतानाचे एक दृश्य आहे. हा सीन जयपूरच्या रस्त्यांवर भर गर्दीत चित्रीत करण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्रतिकने या भूमिकेसाठी केलेला मेकओव्हर इतका जमून आला होता की, रस्त्यावरील लोकांनी त्याला ओळखलेच नाही. या दृश्यासाठी ह्रतिकने दाढी वाढवलेली होती. खांद्यावर उपरणे आणि अघळपघळ कपडे पेहरावात त्याने हे दृश्य चित्रीत केले.
हृतिकने आजपर्यंत अनेक भूमिक वठवल्या आहेत. पण पहिल्यांदाच तो सर्वसामान्याच्या भूमिकेत दिसणार असल्याने, त्याच्या या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून आहे. हा सिनेमा गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे.
या सिनेमात मृणाल ठाकूर ही हृतिकच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहे. हा सिनेमा 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *