killer_1508757121_618x347

धक्कादायक ! अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने कापले पतीचे गुप्तांग

देश

killer_1508757121_618x347

पंजाबच्या जालंधर शहरात राहणा-या एका महिलेने याच संशयापोटी आपल्या नव-याचे गुप्तांग कापून टाकले. रात्री पती झोपेत असताना तिने लोखंडी रॉडने पतीच्या डोक्यावर प्रहार केला. पती बेशुद्ध झाल्यावर तिने चाकूने पतीचे गुप्तांग कापले आणि शौचालयात फेकून दिले. या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेच्या हल्ल्यात आझाद सिंह गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे जोडपे जालंधरच्या जोगिंदर नगमध्ये राहते. मंगळवारी रात्री आझाद सिंह गाढ झोपेत असताना सुखवंत कौरने त्याच्यावर हल्ला केला.
सहायक पोलीस आयुक्तांनी माहिती दिली की, ‘महिलेने पतीवर झोपल्यावर लोखंडी रॉडने वार केला. तो बेशुद्ध झाला. त्यानंतर तिने त्याचं गुप्तांग कापून ते शौचालयात फेकलं. रक्तस्राव अधिक झाल्याने सिंहला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. सिंहच्या वडीलांच्या तक्रारीवर महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आजाद आणि सुखवंत यांना दोन मुलं आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *