Colorful Hindu wedding in India

संपत्तीला वारस मिळावा म्हणून वयाच्या ८३ वर्षांच्या वृद्धानं केलं ३० वर्षांच्या मुलीशी लग्न

देश

 

 

Colorful Hindu wedding in India

राजस्थानमधल्या एका ८३ वर्षांच्या वृद्धानं केवळ मुलगा हवा यासाठी ३० वर्षांच्या महिलेशी विवाह केला आहे. सुक्रम भैरवा असं या वृद्धाचं नाव असून वाडवडिलार्जित संपत्तीसाठी वंशाचा दिवा हवा या एकमेव कारणासाठी हा विवाह त्यानं केला आहे. नव्या बायकोकडून आपल्याला मुलगा होईल व त्यातून संपत्तीला वारसा मिळेल, अशी त्याला आशा आहे.
करौलीमधील सम्रडा गावात राहणाऱ्या सुक्रम भैरवा यांचे साठ वर्षापूर्वी त्यांची पत्नी बट्टो यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत. तर त्यांच्या मुलाचा वीस वर्षापूर्वी एका अपघातात मृत्यू झाला. भैरवा यांची सम्रडा येथे भरपूर संपत्ती असून दिल्लीतही त्यांचे अनेक प्लॉट्स आहेत. मात्र आपल्यानंतर या संपत्तीला वारस नसल्याची सल त्यांच्या मनाला टोचत होती. त्यामुळे आपल्याला मुलगा झाला तर आपल्या संपत्तीला वारस मिळेल असा विचार त्यांच्या डोक्यात आला.
मुलाच्या रुपानं माझ्या संपत्तीला वारस मिळवणं हा एकमेव या लग्नाचा हेतू असल्याचं सुक्रम भैरवानं स्पष्ट केलं आहे. राजस्थानमध्ये प्रचंड जमिन व दिल्लीमध्ये प्लॉट असलेल्या आपल्या संपत्तीला मुलगा वारस हवा म्हणून आपण नवऱ्याच्या दुसऱ्या विवाहाला संमती दिल्याचे सुक्रम भैरवाच्या बायकोनं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *