malvan morcha

मालवणात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मच्छीमारांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

कोकण

malvan morcha

स्थानिक प्रशासनाने मच्छीमारांच्या विरोधात सुरु केलेल्या हुकूमशाही कारवाईच्या विरोधात माजी खासदार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज मालवण येथे हजारो मच्छीमार आपल्या विरोधात होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ उस्फुर्तपणे या धडक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी मच्छीमार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है, निलेश राणे आगे बढो…हम तुम्हारे साथ है, मच्छीमाराना न्याय मिळालाच पाहिजे. एलईडी हटवा मच्छिमार जगवा ,समुद्र आमच्या हक्काचा …नाही कुणाच्या बापाचा आदी घोषणांनी परिसर दणाणला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मच्छिमार सहभागी झाले होते. महिलांची हि लक्षणीय उपस्थिती होती.

विशेष म्हणजे सत्तेत असलेले शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी मच्छीमारांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवून आजचा हा मोर्चा फ्लॉप कसा करता येईल यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. परंतु, सर्व मच्छीमारांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार, युवा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होऊन स्थानिक प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना चोख उत्तर दिले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *