1

बांधकाम व्यावसायिक डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांच्या भावाच अपहरण

देश

1

बांधकाम व्यावसायिक आणि डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती त्‍यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
एका इंग्रजी वृत्‍तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे. मोझांबिका एका गुजराती व्यावसायिकाची भेट घेण्यासाठी मोझॅम्बिकची राजधानी मापुटोला गेले होते. शनिवारी त्यांचा शेवटचा फोन आला होता आणि तेव्हापासून ते संपर्कात नसून, त्‍यांचा फोन स्विच ऑफ आहे. अशी माहिती विनोद गोएंका यांनी दिली.
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून मोझॅम्बिक सरकारशी समन्वय साधत चौकशी सुरु आहे. या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयाने गोएंका कुटुंबीयांना दिलं आहे. फोनचं लोकेशन ट्रेस करुन प्रमोद गोएंका यांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *