murder-istock_650x400_71470732799

अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याचा 13 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू

रोजगार

murder-istock_650x400_71470732799

अनुपम विलास पाटील (वय 20, रा़ एलाइट एम्पायर सोसायटी, बालेवाडी) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की अनुपम एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत होता. रविवारी रात्री मित्राकडे जातो, असे सांगून अनुपम घरातून बाहेर पडला. त्याच्या मित्राच्या नातेवाईकाचा फ्लॅट बालेवाडीतील 43 प्रायव्हेट सोसायटीत 13 व्या मजल्यावर आहे. ते कोल्हापूरला राहायला आहेत. अनुपम व त्याच्या चार मित्रांनी पार्टी करायचे ठरविले होते. त्यांनी फ्लॅटवर मद्याच्या बाटल्या व जेवणही आणले. रात्री साडेअकराच्या सुमारास अनुपम आणि त्याचे मित्र बाल्कनीत थांबले असताना अनुपम बाल्कनीतील शिडीवर चढण्याचा प्रयत्न करीत होता पण तोल जाऊन तो पडला़ आणि त्याचा मृत्यू झाला.मित्रांसोबत पार्टी करणा-या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याचा 13 व्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बालेवाडी येथील 43 प्रायव्हेट सोसायटीत रविवारी रात्री घडली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *