baroda-sahitya-samelan_20180151948

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बडोद्यात उद्घाटन

देश

baroda-sahitya-samelan_20180151948

यावर्षीचे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होत आहे. बडोदा येथे यापूर्वीदेखील साहित्य संमेलने झालेली आहेत. यंदाचे हे चौथे संमेलन आहे. दुपारी ४ वाजता संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला बडोद्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आलं. राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत.
बडोद्याच्या राजवाड्यापासून साहित्य संमेलनाच्या आवारापर्यंत ग्रंथदिंडी निघाली. यावेळी शहरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *