mum-12003

राष्ट्रपतीनं कडून कॅप्टन अमोल यादव यांना कौतुकाची थाप

मुंबई

mum-12003

भारतीय बनावटीचं स्वदेशी विमान साकारण्याच्या प्रयत्नात असलेल्या कॅप्टन अमोल यादव यांना आज एक अनोखी कौतुकाची थाप मिळाली. राष्ट्रपती जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले होते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल यादव यांच्या या उपक्रमाची माहिती दिली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज अमोल यादव यांच्या पत्नी, आई-वडील, भाऊ यांनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी कॅप्टन अमोल यादव यांच्या धडपडीचं कौतुक तर केलंच, पण विमान पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा आई-वडिलांना त्याची सफर घडव असा प्रेमळ सल्लाही राष्ट्रपतींनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *