coins-02-1496395601

कोणत्याही किमतीची नाणी डिपॉझिट किंवा एक्स्चेंज करावीत,सर्व बँकांना आरबीआयचे निर्देश

देश

coins-02-1496395601

कोणत्याही बँकेची शाखा कमी किमतीची नाणी किंवा नोटा नाकारु शकत नाही, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. तरी विविध बँकांच्या शाखांनी अल्प किमतीची नाणी किंवा नोटा नाकरल्याच्या तक्रारी येत आहेत, असं आरबीआयने सांगितलं.
नाणी डिपॉझिट किंवा एक्स्चेंज करण्यास बँकांनी नकार दिल्यास दुकानदार किंवा छोटे व्यापारीही ग्राहकांकडून नाणी घेणार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होईल, असं आरबीआयने स्पष्ट केलं.
‘कोणत्याही किमतीची नाणी डिपॉझिट किंवा एक्स्चेंज करावीत, अशा सूचना सर्व बँकांनी तात्काळ आपापल्या शाखांना द्याव्यात’ असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले. एक आणि दोन रुपयांची नाणी वजनावर घ्यावीत, असा सल्लाही आरबीआयने दिला.
पॉलिथिन सॅशेमध्ये १०० नाण्यांचा जुडगा दिल्यास कॅशिअर आणि ग्राहक अशा दोघांनाही सोयीचं ठरेल, असंही आरबीआय म्हटलं. आदेशांचं गैरपालन करणं हा आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचं उल्लंघन मानलं जाईल. संबंधित बँक शाखांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही आरबीआयने स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *