Centutry

उल्हासनगर परिसरात सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळती

मुंबई

Centutry

उल्हासनगर शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री ९ वाजताचा सुमारास गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं. यावेळी एका गॅस पाईपलाईनमधून विषारी गॅसची अचानक गळती सुरु झाली. वायुगळतीनंतर ३४ वर्षीय संजय शर्मा यांचा जागीच गुदमरुन मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गॅस गळती रोखणाऱ्या पथकासह अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
गॅसगळती झाल्यावर कंपनीच्या वतीने कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची सुविधा पुरवण्यात आली नसल्याचा आरोप कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
यापूर्वीही अनेक कामगारांना विषारी गॅस गळतीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र या कंपनीत आजही हंगामी कामगारांना राबवून त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *