273174-205327-fire1

उत्तरकाशीतील सावणी गावात भीषण आग, आगीत संपूर्ण गाव जळून खाक

देश

273174-205327-fire1

उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटर दूर असलेलं हे सावडी गाव हिमाचलच्या सीमेला लागून आहे. गावातील एका घराला लागलेल्या आगीने क्षणभरातच रौद्ररुप धारण केलं. या आगीत संपूर्ण गांव जळून खाक झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीत गावातील ३९ घरं पूर्णपणे जळून खाक झाली. रात्री उशीरा लागलेल्या या आगीत होरपळून गावातील प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.
या भीषण आगीत गावातील सर्व घरं जळून खाक झाली. तसेच ४० बकऱ्या, ४० मेंढी, २४ गाई आणि ५ बैलांचा होरपळून मृत्यू झाला. गावातील सर्वच घरं ही लाकडापासून बनवण्यात आली होती त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *