f400d1e462b27b2e8211b27e4b150970

लवकरच सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत उपलब्ध करण्याचा जर्मनी सरकारचा निर्णय

विदेश

f400d1e462b27b2e8211b27e4b150970

जर्मनी सरकारने देशातील वायू प्रदूषण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज देशांपैकी एक असणाऱ्या जर्मनीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खाजगी चारचाकी गाड्यांचा वापर करतात. त्यामुळे देशासमोर वायू प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. श्वसनाशी संबंधीत आजारांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. म्हणूनच आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत उपलब्ध करून गाड्यांचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याचे जर्मनीमधील सरकारने ठरवले आहे. युरोपियन महासंघाच्या वायू प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उंल्लघन करत असल्याने बर्लिनला मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. असे झाल्यास जर्मनीमधील ट्रेन, बस, ट्रामचा प्रवास मोफत करता येणार आहे.
मोफत सार्वजनिक वाहतूकीबरोबरच कायद्यांमध्ये अनेक बदल करुन प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जर्मन मंत्र्यांनी सांगितले. बस तसेच टॅक्सीमधून बाहेर येणाऱ्या धूरांबद्दल कठोर नियम करणे, वाहतूकीच्या नियमांमध्ये बदल करणे, वायू प्रदूषण मुक्त झोनची घोषणा करणे, कमी वायू प्रदूषण करणाऱ्या गाड्या वापरणाऱ्यांना कर सवलतींबरोबर सध्याच्या गाड्यांमधील तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासारख्या उपाययोजना राबवण्यासंदर्भातील नियोजन सुरु असल्याचेही जर्मनीने सांगितले आहे.

या संदर्भात पर्यावरण मंत्री बार्बरा हेन्ड्रीक्स, अर्थमंत्री पीटर अल्टमेरी आणि कृषीमंत्री ख्रिश्चन सीमीड यांनी मंत्र्यांनी युरोपीयन महासंघाचे पर्यावरण आयुक्त करमेन्यू वेल्ला यांना एक पत्र पाठवले आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे जर्मनीसमोरील सर्वात मोठे आव्हान असून त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेण्यास सुरुवात केली असल्याचेही या या पत्रात म्हटले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *