PNB_2

पंजाब नॅशनल बँकेकडून पत्रकार परिषद आयोजित, ग्राहकांनी घाबरु नये – एमडी सुनील मेहता

देश

PNB_2

दिल्लीमध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ग्राहकांनी घाबरु नये, असं आवाहनही यावेळी सुनील मेहतांनी केलं.पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11 हजार 360 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आज पीएनबीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेने दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून बँक या प्रकरणातून पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या ब्रीच कँडी शाखेतून डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांनी बँकेची आर्थिक फसवणूक केली. यानंतर त्याच्या देशभरातील 10 ठिकाणांवर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडून झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *