Maximum-Withdrawal-Money-from-Punjab-National-Bank-PNB-ATM-Per-Day

पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार

देश

Maximum-Withdrawal-Money-from-Punjab-National-Bank-PNB-ATM-Per-Day

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) मुंबईतल्या काही शाखांमध्ये ११,५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. सकाळ ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

नियमानुसार ही बाब बँकेनं राष्ट्रीय शेअर बाजार तसंच मुंबई शेअर बाजाराला कळवल्यानंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली. त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटून PNB च्या समभागासह शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली.

हिरे व्यापारी नीरव मोदी याने बँकेच्या अधिकाऱ्यांच्या साह्याने हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यात काही बड्या सराफांचे लागेबांधे असून त्यात आणखी काही बँकांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

परदेशातील देणी चुकती करण्याच्या उद्देशाने सराफा व्यावसायिकांनी नियमबाह्यपणे दक्षिण मुंबईतील PNBच्या शाखेतून अल्प मुदतीची कर्ज घेतली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच मोदी यांना बनावट हमीपत्रं दिली. २०११ पासून हा प्रकार सुरू असल्याचं तपासात उघड झालं.

बँकेच्या तक्रारीनुसार CBIने नीरव मोदीसह सात जणांवर गुन्हा नोंदवला. केंद्र सरकारनं PNBला ५,४७३ कोटी रुपयांची भांडवली मदत केली होती. बँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या सरकारच्या मनसुब्यांना याने धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *