bluewhale-holding-875

कात्रजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र

bluewhale-holding-875

कात्रजमध्ये एका तरुणाने केलेल्या आत्महत्येमागे “ब्लू व्हेल’ गेमची शक्‍यता पोलिसांकडून पडताळली जात आहे. या तरुणाकडे चार अॅन्ड्रॉइड फोन होते. तसेच, त्याला रात्री उशीरापर्यंत मोबाइलवर गेम खेळण्याची सवय होती. मध्यंतरी गेम खेळण्याच्या नादात त्याने पायावर ब्लेडने वार केले होते.युसूफच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनूसार त्याला रात्री उशीरापर्यंत मोबाइलवर गेम खेळण्याचे व्यसन होते. त्याच्या जवळ चार अॅन्ड्रॉइड मोबाइल होते. “ब्लू व्हेल’चा टास्क पूर्ण करण्यासाठी त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, त्याच्या चारही मोबाइलचे लॉक काढण्याची तपासणी केल्यावरच त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकणार आहे.
जगभरात ब्लू व्हेलने झालेल्या आत्महत्या करणाऱ्यांच्या शरीरावरही असे वार झालेले आढळले आहेत. यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या या तरुणाच्या मोबाइलचे लॉक काढण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. लॉक काढल्यानंतर त्याने आत्महत्या नेमकी “ब्लू व्हेल’ गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी केली की इतर काही कारण आहे याचा उलगडा होणार आहे.

युसूफ याकुब शेख (२४, रा.संतोषनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो रविवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत घरच्यांना आढळला. त्याच्या वडिलांची कात्रज, कोंढवा, संतोषनगर आदी ठिकाणी भंगाराची दुकाने आहेत. या व्यवसायात युसूफ मदत करायचा. तो रात्री घरी आल्यावर उशीरापर्यंत मोबाइलवर गेम खेळत असायचा. त्यांच्या मित्रांनाही या सवयी विषयी माहिती होते. मध्यंतरी त्याने पायावर ब्लेडने वार केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *