crime

धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

देश

crime

गाजियाबादमधील विजयनगर परिसरात एका माथेफिरु तरुणाने महिलेवर १२ वार केल्याने या हल्ल्यात पीडित महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वत: पोलीस स्थानक गाठत आत्मसमर्पण केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाचं दहा महिन्यांपूर्वी लोनी परिसरात राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं होतं. त्यानंतर आपल्या दहावीची परीक्षा देण्यासाठी प्रियांका पुन्हा माहेरी आली होती.
असं म्हटलं जात आहे की, आरोपी प्रियांकावर लक्ष ठेवून होता. ज्यावेळी प्रियांका सायंकाळच्या सुमारास घरी परतत होती. त्यावेळी आरोपी आरोपीने तिला गाठलं आणि तिच्यावर सपासप वार केले. प्रियांकाची हत्या झाल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांनी आंदोलन करत गोंधळ घातला. तसेच आरोपीला आमच्या स्वाधिन करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. तसेच गोविंदपुरी चौकीच्या प्रभारी पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *