IPL

यंदाच्या आयपीएल मोसमाचं वेळापत्रक जाहीर

क्रीडा

IPL

आयपीएलच्या ११ व्या हंगामाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने यंदाच्या आयपीएल मोसमाची मुंबईतील वानखेडे स्टेडिअममधून सुरुवात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानातून स्पर्धेला सुरुवात होणार असून जवळपास दिडमहिन्यांहून अधिक काळ रंगणाऱ्या स्पर्धेतील अंतिम सामना २७ मे २०१८ ला मुंबईच्या मैदानातच रंगणार आहे.
एकाच दिवशी दोन सामन्यांची सुरुवात 8 एप्रिलला दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्याने होईल. तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात ईडन गार्डनवर होईल.
यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचं दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन होत आहे. जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडिअम हे राजस्थान रॉयल्सचं होमग्राऊंड असेल. राजस्थानची पहिली लढत 9 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादशी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *