florida

अमेरिकेत माजी विद्यार्थ्यांचा अंधाधुंद गोळीबार

विदेश

florida

अमेरिकेत फ्लोरिडामध्ये एका शाळेत बुधवारी माजी विद्यार्थ्याने गोळीबार केला आहे.शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या एकाने शाळेत प्रवेश केला आणि त्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सुमारे १७ जण ठार तर अनेकजण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. ज्या विद्यार्थ्याने गोळीबार केला तो शाळेचा माजी विद्यार्थीच निघाला. निकोलस क्रूझ असे या संशयित आरोपीचे नाव आहे. मृतांचा खच पडल्यानंतर अखेर तो स्वत:हून पोलिसांना शरण गेला. तोपर्यंत संपूर्ण शाळेच्या परिसरात रक्ताचा सडा पडला होता. जीवाच्या आकांताने सर्वजण ओरडत, आक्रोश करत होते, विव्हळत होते. अनेकांचे मोबाइल वाजत होते. निकोलसने प्रथम शाळेच्या आत गोळीबार केला. नंतर त्याने शाळेच्या बाहेरही गोळीबार केला. मृतांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर काही व्यक्तींचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *