Capture

शहरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट

महाराष्ट्र

Capture

धुळे शहरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला असून मागील अडीच वर्षात ४ हजार नागरिकांना श्वानदंश झाला आहे़ तर अ‍ॅन्टी रेबिज लसीकरणावर अडीच वर्षात २० लाख रूपयांचा खर्च झाला आहे़ श्वानदंश झालेल्यांमध्ये अनेक वृध्द नागरिक, लहान बालकांचा समावेश आहे़ प्रत्येक भागात मोकाट श्वानांच्या झुंडी दिसून येतात़ रात्रीच्या वेळी तर शहरातून फेर-फटका मारणे धोक्याचे होऊन बसले आहे़ रात्रीच्या वेळी बाहेर गावाहून येणारे नागरिक, कामावरून घरी परतणारे कामगार यांना मोकाट श्वानांच्या दहशतीचा सामना करावा लागतो़ शिवाय वाहने चालवित असतांना अचानक रस्त्यात श्वान आल्यास वाहनाला अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत़ तरी देखील मोकाट श्वानांच्या समस्येकडे मनपा आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम त्वरीत हाती घेण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *