Taj_Mahal_(Edited).jpeg

ताजमहल बघण्यासाठी तिकिटासाठी मोजावे लागणार ५० ते २०० रुपये

देश

Taj_Mahal_(Edited).jpeg

येत्या १ एप्रिल पासून ताजमहाल पाहाण्यासाठी प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली असून पर्यटकांना आता ४० ऐवजी ५० रू. आकारण्यात येणार आहे. तसेच १६व्या शतकातील मुख्य कबरीला पाहाण्यासाठी २०० रू. शुल्क आकरले जाणार आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी मंगळवारी सांगितले की, ताजमहाल पाहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांना तिकीट खरेदी करतेवेळी दोन पर्याय दिले जातील. ज्यांना केवळ ताजमहाल आणि परिसर बघायचा आहे अशा पर्यटकांना ५० रुपयाचे तिकीट घ्यावे लागेल. तर कबरीलाही भेट द्यायची असल्यास २०० रुपये मोजावे लागतील. ताजमहाल पाहाण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक आग्रा येथे येतात. या ऐतिहासिक वास्तुला पाहाण्यासाठी गर्दी होते. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून तीन तासांपेक्षा आत जास्त वेळ थांबल्यास पुन्हा प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
परदेशी पर्यटकांसाठी तिकीट दर सध्या १२५० असणार आहेत. तसेच तक्रार निवारण क्षेत्राची स्थापना करण्यात येणार असून पर्यटकांसाठी एक सुरक्षित कॉरिडोर तसेच नागरी विमानतळ आणि रस्ते वाहतूक करण्याविषयी वाहतूक मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे.

तसेच लाल किल्ला आणि कुतूबमिनार या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी सुद्धा होणारी गर्दी कमी करण्यासाठी अशी योजना आखली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *