Virat-Kohli-784x441

टीम इंडियाचा द. आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका विजय, मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी

क्रीडा

Virat-Kohli-784x441

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेर भारतानं पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्यांच्या देशात एकदिवसीय मालिका जिंकली आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 275 धावांचं आव्हान दिलं होतं.भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.
भारताकडून रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावूनही टीम इंडियाला 50 षटकांत सात बाद 274 धावांचीच मजल मारता आली. रोहितने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं सतरावं शतक झळकावलं.
हाशिम अमलाने एक खिंड लढवून दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी संघर्ष केला. पण तो 71 धावांत धावचीत झाला आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 57 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *