maxresdefault

मराठवाडा-विदर्भात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

महाराष्ट्र

maxresdefault

मराठवाडा-विदर्भात पुढचे २ दिवसही वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे.
मात्र, तोंडचा घास हिरावल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यासमोर समस्यांचा डोंगर आ वासून उभा राहिला आहे. लिंबाएवढ्या गारांनी शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं आहे. त्यामुळे पुढचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याला आणखी आटापिटा करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *