timthumb

कृषि क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

timthumb

कृषि क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. सत्तेत आल्यापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत.सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषि महोत्सव व दख्खन जत्रा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अवकाळी पाऊस, अवर्षण, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतमालाच्या किंमती पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले. दुष्काळी भागातील सिंचनाच्या सुविधांना प्राधान्य दिले.पश्‍चिम महाराष्ट्रातील टेंभू, ताकारी,योजनांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेच्या माध्यमातून ५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या माध्यमातून उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर आणि ठिबक सिंचन वापरून शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ५० हजार एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *