mahashivratri2018

श्री सोमनाथ सारसोली, महाशिवरात्री यात्रा २०१८ , वर्ष ५० वे

संपादकीय

mahashivratri2018

छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी म्हणजे रायगड आणि श्री धावीर महाराज देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहा तालुक्यातील सारसोली हे एक छोटेसे गाव. रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहर अलिबाग पासून रेवदंडा-रोहा मार्गावर ५० किमी अंतरावर व तालुक्याचे ठिकाण असलेले रोहा पासून रोहा- साळाव या मार्गावर सारसोली हे गाव वसलेले आहे.निसर्गाच्या सानिध्यात साधारणता १२५ -१५० कौलारू घरांच्या वस्तीचे सारसोली येथील तीन नद्यांच्या संगमी तीरावर स्थापन झालेले स्वयंभू श्री सोमनाथाचे मंदिर म्हणजे गावाचा जणू मान बिंदूच होय. तीन नद्यांचा त्रिवेणी संगम असल्यामुळे श्री सोमनाथ मंदिराला तीर्थ क्षे त्राचे पावित्र्य व महत्व प्राप्त झाले आहे. सारसोली येथील श्री सोमनाथ म्हणजे प्रत्येकाच्या हाकेला धावणारा, प्रत्येकाचे रक्षण करणारा.. गावातील रहिवासी असो,पंचक्रोशीतील असो किंवा एखादा पाहुणा असो. एकदा इथे आला कि तो कायम श्री सोमनाथाच्या चरणी विलीन होतो. प्रत्येक भाविक मोठ्या श्रद्धेने, भक्तीने येथील मंदिराला भेट देतात.

यात्रा म्हटलं कि अंगात उत्साह येतो, मित्रांना – नातेवाईकांना भेटण्याचा, मौज मजा करण्याचा आणि खरेदीचा.. गेल्या पाच दशकांपासून अनेक पिढ्या पाहिलेल्या सारसोली येथील महाशिवरात्र यात्रेचा उत्साह अजूनही त्याच जोमाचा आहे. मागील ५० वर्षांपासून सुरु असलेली हि महाशिवरात्रीची यात्रा म्हणजे फक्त एक उत्सव नसून सारसोली येथील ग्रामस्थांनी जपलेली ती एक अनमोल परंपरा आहे आणि आज या परंपरेला ५० वर्षे पूर्ण होत असून , गावकऱ्यांची एकता, एकमेकांमध्ये असलेली बंधूता, स्त्री – पुरुषांमध्ये असलेली वैचारिक समानता हि सारसोली गावाची ओळखच नव्हे तर ती आता संस्कृती बनलेली आहे. आणि या संस्कृतीचे पालन येथील प्रत्येक नागरिक,युवक – युवती काटेकोरपणे करतात हि श्री सोमनाथाने प्रत्येकाला दिलेली एक देणगीच होय.

सारसोली येथील महाशिवरात्र यात्रेला यंदा ५० वर्ष पूर्ण होत असल्याने सारसोलीच्या सर्व ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन आणि गावकऱ्यांच्या एकोप्याला सलाम !

धन्यवाद ,
नितीन पाटील
मोबा. – ९९६०८५७५८१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *