whatsapp-estados-screenshot

आता पैशाची देवाण-घेवाण करता येणार व्हॉट्सअॅपवरून

रोजगार

whatsapp-estados-screenshot

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून आता पैशाची देवाण-घेवाण करता येणार आहे. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून UPI वापरायची परवानगी व्‍हॉट्‍सॲपला देण्यात आली आहे. त्यामुळे पेटीएम, मोबिक्वीकप्रमाणे UPI द्वारा व्हॉटस्ऍपच्या माध्यमातूनही ग्राहकांना पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे. मात्र सध्या तरी हि सुविधा फक्त बीटा व्हर्जनसाठी आहे. अॅन्ड्रॉइडच्या 2.18.41 बीटा व्हर्जनमध्ये पेमेंट फीचरसाठी ऑप्शन देण्यात आलं आहे. तर iOS यूजर्सला पेमेंटचे अपडेट V2.18.21 या व्हर्जनवर उपलबद्ध असेल.
व्हॉट्सअॅपबाबत वेळोवेळी माहिती लिक करणा-या @WABetaInfo या आयडीवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. काही युजर्सनं याचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कसे होतील पैसे ट्रान्सफर? या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. यात सेटिंगमध्ये तुम्हाला एक नवीन टॅब मिळेल.
ज्यात पेमेंटचा पर्याय देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या बॅंक अकाऊंटचा वापर करुन युपीआयशी जोडू शकता. येथे तुम्हाला नवा ऑथेंटिकेशन पिन मिळेल. या नंतर तुम्ही यातून बॅंकेचे नाव सिलेक्ट करुन पेमेंट करु शकता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *