Mumbai-Gateway-625x470

देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगभरातील श्रीमंतांच्या यादीत १२ व्या स्थानी

देश

Mumbai-Gateway-625x470

देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगभरातील श्रीमंतांच्या यादीत झळकली आहे. ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यात जगातील श्रीमंत शहरं आणि अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई १२ व्या स्थानी आहे. तर न्यूयॉर्क पहिल्या स्थानी आहे. न्यूयॉर्कची संपत्ती सुमारे तीन लाख कोटी डॉलरच्या घरात आहे. तर २.७ लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले लंडन दुसऱ्या स्थानी आहे. २.५ लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले टोकियो तिसऱ्या आणि २.३ लाख कोटी डॉलर्सची संपत्ती सॅन फ्रान्सिस्को चौथ्या स्थानी आहे. चीनमधील बिजिंग हे शहर २.२ लाख कोटी डॉलरसह पाचव्या स्थानी आहे. ९५० अब्ज डॉलरसह मुंबई १२ व्या स्थानी असून टॉरोन्टो, फ्रँकफर्ट, पॅरिस या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *