Facts-Related-To-Indian-Railways

रेल्वेच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई – रेल्वे मंत्रालय

देश

Facts-Related-To-Indian-Railways

रेल्वेच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. जे कर्मचारी दीर्घ काळापासून परवानगी न घेता अनुपस्थित आहेत अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेने कोणत्याही सूचनेशिवाय कामावर येत नसलेल्या १३, ५०० कर्मचाऱ्यांना शोधून काढले आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची कारवाईही रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.रेल्वेची कामगिरी चांगली होण्यासाठी व निष्ठावान आणि कष्टाळू कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी एक अभियान सुरू केले आहे. ही कारवाई त्याचाच भाग असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
या अभियानात रेल्वेला १३ लाख कर्मचाऱ्यांमधून १३,५०० असे कर्मचारी आढळून आले, जे कोणतीही सूचना न देता दीर्घ कालावधीपासून अनुपस्थित आहेत. ‘अशा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात येईल,’ असे रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *