647039-india-vs-south-africa

भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

क्रीडा

647039-india-vs-south-africa

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. जोहान्सबर्गच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या आजच्या चौथ्या वन-डे सामन्यात भारत विजयी झाल्यास मालिकाही भारताच्या नावे जमा होईल.
दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने आजचा सामना करो या मरो अवस्थेतला आहे.
एबी डीव्हिलीयर्सचं संघातलं पुनरागमन हा आफ्रिकेसाठी एकमेव सकारात्मक मुद्दा ठरणार आहे. पहिल्या ३ सामन्यांमध्ये आफ्रिकेला चारीमुंड्या चीत करणाऱ्या भारताने चौथ्या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. मधल्या फळीतला अष्टपैलू खेळाडू केदाज जाधव तंदुरुस्त नसल्यामुळे त्याच्या जागेवर मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात जागा देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *