636046215443097272-CRIME-gen-NP

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने केला एका व्यक्तीचा खून

देश

636046215443097272-CRIME-gen-NP

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने एका संशयित व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे.आरोपी नवरदेव आणि त्याचे मित्र विवाह सोहळ्यामधील रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी सासरी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदायूं जिल्ह्यातील बिल्सी येथील हा प्रकार आहे. येथील सुरेंद्र नावाच्या तरुणाचा विवाह सूरजपूर गावात होणार होता. बुधवारी सुरेंद्र वऱ्हाड घेऊन गावात आला. तेथे विवाहासाठी त्याने पायातील चपला काढून ठेवल्या. विवाहातील विधी पूर्ण झाल्यानंतर सुरेंद्रचा चपला हरवल्याचे समोर आले. त्यामुळे नवरदेव सुरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी तेथेच उभ्या असलेल्या रामसरणवर चपला चोरल्याचा आरोप केला.
वादावादी वाढताच त्यांनी रामसरण याल मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असलेली मंडळी मध्यस्ती करून रामसरणला वाचवेपर्यंत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी रामसरणला रक्तबंबाळ केले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *