18-Devendra-Fadnavis

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

महाराष्ट्र

18-Devendra-Fadnavis

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रानं जाहीर केलेल्या तारखेनुसार राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सातव्या वेतन आयोगासंबंधी बक्षी समीतीचे काम सुरू असुन समितीने पोर्टल सुरू केले. गुणवत्तापुर्ण कामासाठी वेतन आयोग महत्वाचा आहे. या पोर्टलवर अधिकारी महासंघाने माहिती भरावी. वेतन त्रुटी राहु नये याची दक्षता घ्यावी. वेतन आयोगासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महासंघाच्या मागणीनुसार महागाई भत्ता फेब्रुवारीपासुन रोखीने देण्यात येईल. थकबाकीबाबत संघटनांशी चर्चा करून तो लाभही देण्यात येईल. महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या बालसंगोपन रजेचा विषय लवकरच मंत्रीमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

निवृत्ती वय ५८ वरुन ६० आणि पाच दिवसांचा आठवडा याबाबत निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *