Dhoni

महेंद्रसिंह धोनी यष्टीपाठी चारशे विकेट्सचा टप्पा ओलांडणार भारताचा पहिला यष्टिरक्षक

क्रीडा

Dhoni

भारताच्या महेंद्रसिंग धोनीनं वन डे कारकीर्दीत यष्टीपाठी चारशे विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला तर जगातला केवळ चौथा यष्टिरक्षक ठरला.
धोनीने हा चारशे विकेट्सचा टप्पा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एडन मारक्रमला यष्टिचीत करून गाठला. मग त्याने डेव्हिड मिलरचा झेल पकडून आपल्या यष्टिपाठच्या विकेट्सची संख्या ४०१ वर नेली. ३१५ एकदिवसीय सामन्यात धोनीने यष्टीमागे २९५ झेल आणि १०६ यष्टिचीत अशी कामगिरी बजावली आहे. एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या कुमार संगकाराने यष्टीपाठी सर्वाधिक ४८२ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टने ४७२ आणि दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरने ४२४ गडी टिपले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *