061220071353

संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा लाखो भाविकांच्या साक्षिने शेगाव येथे उत्साहात साजरा

महाराष्ट्र

061220071353

‘गजानना अवलीया, अवतरले जग ताराया’, ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रकटदिनोत्सवाला १ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली, असून याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत. या प्रकट दिनानिमित्त एक फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या उत्सवात राज्यभरातील तब्बल एक हजाराच्यावर दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत होत आहे. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी १२ वाजता गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. प्रकट दिनानिमित्त भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पार्किंग व्यवस्थाही शहरात ठिकठिकाणी करण्यात आली होती. दिंड्यांच्या आगमनामुळे विदर्भपंढरीत भक्तीमय वातावरण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *