Fire-Flames

मुंबईतील गोरेगाव भागात इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गोदामा भीषण आग

मुंबई

Fire-Flames

मुंबईतील गोरेगाव भागात इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कसोशीने प्रयत्न करत आहेत. इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गोदामाला आज सकाळी अचानक आग लागली, त्यानंतर ही आग वेगाने पसरली त्यामुळे थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले.
आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे. आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *