636046215443097272-CRIME-gen-NP

धक्कादायक ! दहावीतील विद्यार्थ्यांनी कोयत्यानं वार करुन केली आपल्याच मित्राची हत्या

महाराष्ट्र

636046215443097272-CRIME-gen-NP

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील पिराळे गावात दहावीतील दोन विद्यार्थ्यांनी कोयत्यानं वार करुन आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.महेश कारंडे असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून हे सगळे समता माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.भरवर्गात ही घटना घडल्यामुळे या शाळेबरोबर परिसरदेखील हादरून गेला आहे.
महेश किसन कारंडे (वय १५) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. घटनेनंतर दोघेही हल्लेखोर मुले शाळेतून पळून गेली आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिरळे गावातील समता माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात सराव परीक्षा सुरू होती. परीक्षेत विद्यार्थी गर्क असतानाच महेश कारंडे याच्यावर त्याच्याच वर्गातीलच अन्य दोन मुलांनी हल्ला चढवला. या वेळी त्यांनी दप्तरातून आणलेल्या कोयत्याने महेशच्या मानेवर घाव घातले. यात महेश जागेवरच कोसळला आणि मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्याच्या वर्गातील दोघेजण परीक्षा न देता पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांचाही शोध घेत त्यांना तात्काळ अटक केली.
दरम्यान, या हत्येमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दिवसाढवळ्या शाळेतील विद्यार्थ्याची हत्या होत असताना ही गोष्ट कुणालाही कळाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *