7544695633256986715073d918c0edc7

राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचा आज संप

महाराष्ट्र

7544695633256986715073d918c0edc7

कनिष्ठ महविद्यालयातील शिक्षकांकडून राज्यभर कॉलेज बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालय बंद असणार आहे.
एकीकडे 12 वीची परीक्षा जवळ आलेली असताना, अनेक कॉलेजमध्ये सराव परीक्षा सुरु आहेत. मात्र, कॉलेज बंद असल्याने या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने २ मे २०१२ पासून शिक्षक भरती बंद ठेवली आहे. अत्यावश्यक बाब म्हणून अनेक ठिकाणी त्यानंतर शिक्षक भरती करण्यात आली आहे. त्या शिक्षकांच्या भरतीला मंजुरी द्यावी. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे अनुदान सुरु करावे आदी मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. त्याचच एक भाग म्हणून आजचा संप पुकारण्यात आला आहे.शासनाने या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, असे पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोष पाचगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *