_1a9d2488-b72e-11e6-93e2-9c0a12f13811

मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई

_1a9d2488-b72e-11e6-93e2-9c0a12f13811

मुंबई महापालिकेचा २०१८-१९ वर्षाचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी शिक्षणासाठी २५६९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांच्याकडे शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात सर्वात महत्त्वाची घोषणा ठरली ती बंद पडलेल्या शाळांना पुन्हा सुरु करण्याची. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) ३५ शाळा पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. या शाळा सीबीएसई, केंब्रिज, सीआयएससीई बोर्डाशी संलग्न असतील. गेल्या तीन वर्षात खरेदी केलेल्या टॅबच्या देखभाल- दुरुस्तीसाठी आणि त्यामधील अभ्यासक्रम अपग्रेड करण्यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल किडझानिया येथे नेण्यात येणार असून यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ई- लायब्ररीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद आहे. तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासह प्रथिनयुक्त पोषक आहार दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *