thumb_82321_default_big

नोकियाने केली ग्राहकांसाठी नोकिया 5 आणि नोकिया 8 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात

व्यापार

thumb_82321_default_big

आपल्या ग्राहकांसाठी नोकिया 5 आणि नोकिया 8 या स्मार्टफोनच्या किंमतीत नोकियाने मोठी कपात केली आहे. तब्बल 8 हजारांची कपात नोकिया 8 स्मार्टफोनच्या किंमतीत करण्यात आल्यामुळे 36,999 रुपयांचा हा स्मार्टफोन आता 28,999 रुपयांना मिळणार आहे.
तर नोकिया 5 च्या 3 जीबी व्हेरिएंट 13,499 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, आता हा फोन 12,499 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच यात 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

नोकिया 8 स्मार्टफोनचे फीचर

5.3 इंच स्क्रीन,
स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर चिप
4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज
अँड्रॉईड 7.1 नॉगट या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित
ड्यूल रिअर कॅमेरा, रेझ्युलेशन 13 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सल
हायब्रिड ड्युल सिम सिस्टम
बॅटरी 3090 mAh

नोकिया 5 स्मार्टफोनचे फीचर

5.2 इंच स्क्रीन आणि 720×1280 रेझ्युलेशन डिस्प्ले
कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
16 जीबी इंटरनल स्टोरेज एसडी कार्डने 128 जीबी
13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट 2 जीबी रॅम,फिंगरप्रिंट सेंसर होम बटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *