Madhuri-Renuka

‘हम आपके है कौन’ पुन्हा बनवला तर त्यातल्या व्यक्तिरेखा मॉडर्न अंदाजात पाहायला आवडतील -: रेणुका शहाणे

मनोरंजन

Madhuri-Renuka

“तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून ‘हम आपके हैं कौन’ पुन्हा बनवला तर मला त्यातल्या व्यक्तिरेखा मॉडर्न अंदाजात पाहायला आवडतील. ‘हम आपके हैं कौन’ हा कौटुंबिक चित्रपट आहे. यात प्रत्येकाचं एकमेकांवर प्रेम आहे. सिनेमात लग्नाचं संगीत, मेहंदी यांसारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. त्याची फॅशन आजही कायम आहे. त्यामुळे ‘हम आपके है कौन’चा रिमेकही सगळ्यांना आवडेल. निशा आणि प्रेमच्या भूमिकेत मला आलिया भट आणि वरुण धवनला पाहायला आवडेल,”असे रेणुका शहाणे म्हणाल्या आहेत. २३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन’मध्ये प्रेमची भूमिका सलमान खानने तर निशाची भूमिका माधुरी दीक्षितने साकारली होती. तर रेणुका शहाणे माधुरीच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत होती.
“सध्याचा काळ मोबाईल फोन, फेसबुक आणि ट्विटरचा आहे. त्यामुळे दिग्दर्शक टफीचे सीन कसे दाखवतील, हे मला माहित नाही. कारण चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये टफी मोहनीश बहलला पत्र आणून देतो, तेव्हा प्रेमच्या निशाबद्दच्या भावना काय आहेत, हे मोहनीशला समजतं. पण चित्रपटाचा रिमेक बनवणं फारच मजेशीर असेल,” असंही रेणुका शहाणे म्हणाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *