retain-your-mobile-number-across-circles-state-from-today-5595c75a00866_l_835x547

ट्रायनुसार आता मोबाईल नंबर पोर्टसाठी लागणार कमी पैसे

व्यापार

retain-your-mobile-number-across-circles-state-from-today-5595c75a00866_l_835x547

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)च्या दरात जवळजवळ ७९ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे नंबर पोर्टेबिलिटीसाठी फक्त ४ रुपये मोजावे लागणार आहेत.
ट्रायने दूरसंचार कंपन्यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत की, प्रत्येक पोर्टिंगसाठी १९ रुपयांऐवजी चार रुपये आकारले जावेत. टेलिकॉम उद्योगातील भागधारकांशी सल्ला-मसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही ट्रायनं यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, ट्रायने एमएनपी शुल्क कमी करण्याची प्रकिया डिसेंबरपासूनच सुरु केली होती. त्यानंतर काल (बुधवार) या निर्णयाची माहिती देण्यात आली. त्यामुळे यापुढे पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना फक्त ४ रुपये मोजावे लागणार आहेत.
ग्राहक आपला जुना मोबाईल क्रमांक कायम ठेऊन टेलीकॉम ऑपरेटर बदलू शकतात. त्यामुळे देशभरात ग्राहक एकच क्रमांक वापरु शकतो. यालाच मोबाइल पोर्टेबिलिटी म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *