270158-google-doodle

कमला दास मल्याळम प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री यांना आज गुगलने डुडलद्वारे दिली मानवंदना

मनोरंजन

270158-google-doodle

कमला दास या मल्याळम साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांच्यावर आज गुगलने डुडल केले आहे. कमला दास यांनी स्त्रियांच्या लैंगिक आयुष्यावर आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर विपुल लेखन केले आहे. स्त्रियांच्या भेडसावणाऱ्या समस्या, त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या समस्या याबाबत त्यांनी लिहिले आहे. कमला दास यांचा जन्म हिंदू परिवारात झाला. मात्र वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यापासून त्यांना सुरैय्या या नावानेही ओळखले जाऊ लागले.
त्यांचा जन्म ३१ मार्च १९३४ रोजी केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात झाला. ३१ मे २००९ ला पुणे येथे त्यांची प्राणज्योत मावलली.लहानपणापासूनच त्यांना कविता लिहिण्याची आवड होती. त्यांची आई बालमणि अम्मा यांचा प्रभाव कमला दास यांच्यावर झाला. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह कलकत्त्यातील माधव दास यांच्यासोबत झाला.माधव दास यांनीही त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले. काही काळानंतर कमला दास यांच्या रचना इंग्रजी आणि मल्याळम भाषेत छापल्या जाऊ लागल्या. १९७६ मध्ये कमला दास यांचे माय-स्टोरी नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी स्त्रियांना भेडसावणाऱ्या लैंगिक समस्याचे चित्रण केले होते. वेगळ्या धाटणीचे पुस्तक लिहिल्याने त्या चर्चेत आल्या. त्यानंतर स्त्रीवादी साहित्य लिहिणाऱ्या लेखिकांमध्ये त्यांनी लौकिक मिळवला.
कमला दास यांना मिळालेले पुरस्कार – :

वर्ष १९८४ साली नोबेल नामांकन
अॅवार्ड ऑफ एशियन पेन एंथोलोजी (१९६४)
केरळ साहित्य अकादमी पुरस्कार १९६९ (‘कोल्ड’ के लिए)
साहित्य अकादमी पुरस्कार (१९८५)
एशियन पोएट्री पुरस्कार(१९९८)
केन्ट पुरस्कार ((१९९९)
एशियन वर्ल्डस पुरस्कार (२०००)
वयलॉर पुरस्कार (२००१)
डी. लिट’ मानद पदवी कालीकट विश्वविद्यालयतर्फे (२००६)
मुट्टाथु वरक़े पुरस्कार ( २००६)
एज्हुथाचन पुरस्कार (२००९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *