269916-199761-blue-moon1

खग्रास चंद्रग्रहण – ब्लू, ब्लड आणि सुपरमून अशा तीन स्थितीत चंद्राचे दर्शन !

देश

269916-199761-blue-moon1

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज आहे. हे खग्रास चंद्रग्रहण खूप विशेष असून सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी चंद्रोदय झाल्यापासून रात्री ७ वाजून ३८ मिनिटांपर्यंत पूर्वेला ब्लू, ब्लड आणि सुपरमून अशा तीन स्थितीत चंद्राचे दर्शन होईल.
आज सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितीजाच्या खाली असल्याने आपणास दिसू शकणार नाही. नंतर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल आणि आपणा सर्वास साध्या डोळ्यांनी सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे दिसते. म्हणून त्याला ‘ ब्लड मून ‘ म्हणतात.
ग्रहण सायंकाळी सात वाजता आहे. त्यावेळी चंद्रबिंब पूर्व आकाशात बरेच वरती आलेले दिसेल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल, चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल.
कधी पहाल चंद्राचे विलोभनीय रूप ?
आज सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून रात्री सात वाजून अडतीस मिनिटांपर्यंत पूर्व आकाशात साध्या डोळ्यांनी सुपर, ब्ल्यू, ब्लडमूनचे आपणास विलोभनीय दर्शन घेता येईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *