राज्यात सर्वत्रच आधार कार्ड सेंटरची संख्या कमी करण्यात आली असून अत्यंत तुटपुंज्या सेंटरवर लोकांची मरणाची गर्दी पाहायला मिळत आहे. तसंच एका आधार कार्ड सेंटरवर केवळ २५ टोकन दिलं जात असल्यानं पहाटे चार वाजल्यापासून आधार कार्ड सेंटरबाहेर रांगा दिसू लागल्या आहेत. सरकारी काम असो वा शैक्षणिक काम. आधार कार्डाशिवाय कोणतंही काम होत नाही. त्यामुळे नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी आणि आधार कार्डात चुकलेली माहिती दुरूस्त करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हातान्हात लहान बाळांना घेवून महिला आधार कार्ड काढण्यासाठी येतायत, परंतु त्यांनाही अनेकदा हेलपाटे खावे लागतात.अनेकजण तर तीनचारवेळा येवून गेलेत तरीही त्यांचे काम झालेले नाही.
Share on Social Media