aaba

खारी – रोहा येथील पुरुषोत्तम देशमुख यांना पितृशोक. आबांच्या निधनाने गुरुनगरवर शोककळा.

कोकण महाराष्ट्र

aaba

खारी येथील रहिवाशी श्री.पुरुषोत्तम देशमुख यांचे वडील कै.अजाबराव देशमुख यांना रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास वृद्धापकाळाने खारी येथील त्यांच्या राहत्या घरी देवाज्ञा झाली. चिमुकल्यांपासून ते जेष्ठांना ‘आबा’ या नावाने प्रचलित असलेले कै.अजाबराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण गुरुनगरवर दुःखाचे सावट पसरले आहे. सोमवार दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर काजूवाडी येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै.अजाबराव देशमुख यांच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एकवटला होता. दिनांक ६ फेब्रुवारी २०१८ रोजी दशक्रिया विधी होणार आहेत.

कै.अजाबराव देशमुख ( आबा ) यांच्या पश्चात मुलगा पुरुषोत्तम देशमुख, सून प्रमिला देशमुख,मुलगी वृंदा पवार, नातवंडे श्रीकांत पवार,माधवी गावडे,शिवानी देशमुख आणि महेश देशमुख असा परिवार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *