rail_web-750x500.jpg.pagespeed.ce.CFDGjqyq5m

वाढत्या प्रवासी गर्दीवर तोडगा हार्बर मार्गावर ३१ जानेवारी पासून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई

rail_web-750x500.jpg.pagespeed.ce.CFDGjqyq5m

३१ जानेवारी पासून या नवीन सेवा सुरु होणार आहेत.दिवसेंदिवस हार्बर मार्गावरील लोकलवर बऱ्याच प्रमाणात ताण वाढत आहे. त्यामुळे प्रवााशांना बराच मनस्तापही सहन करावा लागतो. त्यामुळे या मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.
वाढत्या प्रवासी गर्दीवर तोडगा म्हणून हार्बर मार्गावर १० तर ट्रान्स हार्बर मार्गावर तब्बल १६ नव्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावरील दहा सेवा वाढल्यानं दर दिवासांच्या फेऱ्यांची संख्या ६०४ वरुन ६१४ होणार आहे तर ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांची संख्या २४६ वरुन २६२ वर पोहोचणार आहे. या सेवा सुरु झाल्यावर हार्बर मार्गावरील वेळापत्रकातही बदल होणार असून अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *