marathi

कोमसापची अभिजात मराठी भाषा स्वाक्षरी मोहिम

महाराष्ट्र मुंबई

marathi

कोकण मराठी साहित्य परिषद व मराठी एकिकरण समितीच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्याकरिता मा.पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यासाठी  आज दि.२४ जाने.२०१८ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई  येथे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली .त्यास जनतेने उत्स्फूर्त दाद दिली.सदर निवेदनात
” प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने स्थापलेल्या संशोधक समितीने १२७ पृष्ठांचा मराठीत, तर ४०० पृष्ठांचा इंग्रजीत अभ्यासपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र  शासनाकडे २०१३ मध्ये सुपूर्द करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.तसेच दि.२७ फेब्रुवारी, २०१८ रोजी  मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येत असल्याचे मा.पंतप्रधान यांनी घोषित केल्यास आम्हास आनंदच होईल असे नमूद आहे “.
या मोहिमेसाठी कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.महेश केळुसकर , कार्याध्यक्षा नमिता कीर,प्रा.दीपा ठाणेकर, शशिकांत तिरोडकर,गौरी कुलकर्णी,सूर्यकांत मालुसरे, शिवाजी गावडे ,सुवर्णा जाधव,बाळ कांदळकर यांसह कोमसापचे मुंबई  उपनगर ,नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील बरेच सदस्य  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *