920x920

भिवंडीत चाळीमध्ये चार खोल्या जळून भस्मसात

मुंबई

920x920

भिवंडी शहरात कोटरगेट भागातील दाट लोकवस्तीत आज दुपारी लागलेल्या आगीत चाळीतील चार खोल्या जळून भस्मसात झाल्या. कोटरगेट भागातील अब्दुल गफार यांच्या चाळीतील एका बंद खोलीतून आज दुपारी धुर आणि आगीच्या ज्वाळा निघाल्याने परिसरांत घबराट पसरली.लोकांनी ताबडतोब मनपाच्या अग्निशामक दलास पाचारण केले.परंतू तिनबत्ती येथील मंगळवारचा आठवडा बाजार व अरूंद रस्त्याने झालेली वहातूक कोंडी यामुळे आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला.दरम्यान घटनास्थळी चार खोल्या जळून खाक झाल्या.आगीचे कारण समजू शकले नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *