pratibha-patil

युवापिढीने राजकारणात येऊन लोकहितासाठी काम करावे – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

देश

pratibha-patil

राजकारण केवळ निवडणुका लढण्यासाठी किंवा सत्तेत येण्यासाठी करता कामा नये. लोकांच्या हितासाठी, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत. सत्ताधाऱ्यांनी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तर विरोधकांनी सरकारकडून चांगले काम करून घेण्यासाठी प्रवृत्त करावे. युवापिढीने राजकारणात येऊन लोकहितासाठी काम करावे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज येथे केले.
आठव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपप्रसंगी प्रतिभाताई पाटील बोलत होत्या.अस्पृश्‍यता, व्यसन, भ्रष्टाचार अशा गोष्टींना आपण दूर ठेवायला हवे. गरिबी, आरोग्य, अस्वच्छता व कुपोषण हटविण्यासाठी समविचारी आणि सकारात्मक विचारांनी प्रेरित झालेल्या युवकांनी पुढाकार घ्यावा. निवडणूक प्रक्रियेतील बदलांविषयी आपण बोलले पाहिजे. बदल घडविण्यासाठी इतरांनी पुढाकार घ्यावा आणि आपण पाहत बसावे, हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. प्रामाणिकपणा, कठोर मेहनत, चिकाटी हे गुण चांगले राजकारणी बनण्यासाठी उपयुक्त ठरतात.

तिहेरी तलाक पद्धती हद्दपार करण्याची गरज-
अनेक मुस्लिमबहुल देशात कालबाह्य अशी तिहेरी तलाक पद्धत रद्द झालेली आहे. संविधानावर आधारलेल्या आपल्या भारत देशातही तिहेरी तलाकसारख्या मुस्लिम स्त्रियांवर अन्याय करणारी दृष्ट सामाजिक प्रथा हद्दपार करून समाजाचे नवनिर्माण करण्याची गरज आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *